दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून नशेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी (३ जानेवारी) रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरात घडली. तन्मय जावेद खान (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अारोपी अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील एक पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी तन्मय घरी येत असताना त्याच्या दुचाकीचा अल्पवयीनांच्या दुचाकीला धक्का लागला. आमच्या वाहनाला कट का मारला, वाहनाचे नुकसान झाले म्हणत ४ अल्पवयीन मुलांनी तन्मयला लाथाबुक्क्याने मारहाण करत त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे हे कृत्य करताना अल्पवयीन मुले नशेत होती. नशा उतरल्यावर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. रेल्वे रुळांजवळ सापडला मृतदेह: वाहनांच्या किरकोळ वादात काही मुले तन्मयला मारहाण करत महाकाली मंदिर गौतमनगरकडे गेल्याचे राहीलने सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ महाकाली मंदिराजवळ शोधमोहीम राबवली. तन्मयच्या मोबाइलचे लोकेशन गौतमनगरजवळील रेल्वे रुळांजवळ मिळाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलिस तिथे पोहोचले असता तेथे तन्मयची दुचाकी, मोबाइल व तन्मयचा मृतदेह आढळला. दिल्लीत मुलाचा वर्गमित्रांकडून चाकूने वार करून खून नवी दिल्ली | शाळेतील डॉजबॉल गेम इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यासाठी जीवघेणा ठरला. कारण चेंडू आदळल्यामुळे संतप्त झालेल्या शाळकरी मित्राने पूर्व दिल्लीतील शाळेबाहेर १४ वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तीन शालेय विद्यार्थ्यांसह सात जणांना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त (पूर्व) अभिषेक धनिया यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या सात जणांपैकी पाच अल्पवयीन आहेत. इतर दोन आरोपींत सारथी (१९) आणि डेअरी शॉपचा मालक अमन कुमार (३१) यांचा समावेश आहे. अटकेपूर्वी संशयित शहर सोडून पळून जाण्याच्या बेतात होते. हत्येसाठी वापरलेला चाकू आणि इतर वस्तू पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने संपवले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत आरोपी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी केली असता मारेकरी मुले म्हणाली, तन्मयच्या वाहनाने आमच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे आमच्या वाहनाचे नुकसान झाले, आम्ही त्याला पैसे मागितले असे सांगून त्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याने आमच्या हातून हा प्रकार घडला असल्याची कबुली दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/w9u605I
दुचाकीचा कट लागल्याने 4 मुलांनी केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या:चंद्रपूर शहरातील घटना, नशेत असलेले चाैघेही आरोपी आहेत अल्पवयीन
January 04, 2025
0