Type Here to Get Search Results !

परळीच्या सोसायटीचा एक कोटी रुपयांना गंडा:पंढरपूर येथे संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल

परळी (जि. बीड) येथील राजस्थान मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत पंढरपूरच्या ३० लोकांनी १ कोटी ९६ हजार रुपये एवढ्या रकमेच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र मुदतीनंतरही ठेवीचे पैसे परत देण्यास संस्थेने टाळाटाळ केली. त्यामुळे पंढरपूर येथे संस्थेच्या संचालक मंडळासह पंढरपूर येथील संस्थेचा शाखा व्यवस्थापक आणि रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पंढरपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक देवेंद्र तुकाराम गोंजारी यांनी सेवानिवृत्तीनंतर ८ सप्टे. २०२३ रोजी परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये बँकेचा मॅनेजर स्वप्निल कुलकर्णी यांच्या आग्रहानंतर पेन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादींची सुमारे १६ लाख ९९ हजार इतकी रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली होती. त्यांनी वारंवार मागणी करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाही. याशिवाय राजस्थान मल्टिस्टेटचे चेअरमन, स्थानिक सल्लागार यांना वेळोवेळी भेटून गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, राजस्थान मल्टिस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियाणी, संचालक अभिषेक बियाणी यांना बीड पोलिसांनी अटक केल्याचे समजले व इतर संचालक फरार असल्याची माहिती मिळाली. १८ जणांविरुद्ध तक्रार सोसायटीचे चेअरमन बियाणींसह संचालक बालचंद लोढा, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लढ्ढा, अशोक जाजू, सतीश सरडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, प्रेमलता बाहेती, अभिषेक बियाणी आदी १८ जणांविरुद्ध तक्रार दाखल झाली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5FJvaYC

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.