लॉजिस्टिक व्यवसायात प्रगती करण्यासाठी ‘अवतार पूजा’ आणि ‘परिसाची शक्ती’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोंदू अशोक खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २५ कालावधीत तब्बल ५ कोटी रुपयांचा गंडा घातला. “पूजा केली नाही तर नागदेवता दंश करेल. त्यात तुमचा मृत्यू होईल,” अशी भीती दाखवून खरातने जासूद यांच्याकडून ९० लाखांची मर्सिडीज कार (एमएच १५ जीएल ८१८१) आणि अमेरिकेतील उपचारांचा खर्चही उकळला. याप्रकरणी बुधवारी (२५ मार्च) सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरुद्ध एकुणात नववा गुन्हा दाखल झाला. परिसाची शक्ती मिळवण्यासाठी त्याने जासूद यांना म्यानमार ते ग्रीनलँड अशा २१ देशांत फिरायला भाग पाडले. “मला स्वर्गातून बोलावणे आले आहे” असे सांगून जमिनीवर झोपून मरणाचे नाटक केले. जासूद यांना उपचारापोटी सुमारे ३० लाख रुपये खर्च करायला लावले. दरम्यान, खरातशी लागेबांधे असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांची मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातून महसूलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीची अशोक खरातच्या मुलीसोबत भागीदारी नाशिकच्या पाथर्डी शिवारातील अंदाजे १ एकर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर भांडे पाटील यांच्या पत्नी प्रीती भांडे पाटील आणि अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात यांची नावे ‘संयुक्त मालकीदार’ म्हणून आढळली आहेत. केवळ जमीनच नव्हे, तर काही स्टार्टअप्स आणि रिअल इस्टेट फर्म्समध्येही दोन्ही कुटुंबांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. अशोक खरातशी संबंधित एसआरए प्रकल्पांमधील वादग्रस्त फायली आणि निर्णयांमध्ये भांडे पाटील यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने प्रशासनाने हा पवित्रा घेतला आहे. ‘ब्रह्मसदन’वर एसआयटीची धडक; मध्यरात्रीपर्यंत मिरगावात तपासणी खरातच्या पापकर्मांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) कंबर कसली आहे. मंगळवारी रात्री उशिरा पथकाने मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरातील त्याच्या ब्रह्मसदन या आलिशान बंगल्याची झडती घेतली. यापूर्वी पोलिसांनी याच बंगल्याची झडती घेतली असता, तेथे एक रिव्हॉल्व्हर, २१ जिवंत आणि ५ वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर एसआयटीने बंगल्याची रचना, तेथील गुपिते आणि संशयास्पद हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत तपासणी केली. तपासणीत पथकाच्या हाती नेमकी काय माहिती लागली, याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. खरातवर सरकारी कृपेचा वर्षाव; मंदिरासाठी १.०५ कोटींचा निधी सिन्नर| खरातच्या मिरगाव (ता. सिन्नर) येथील साम्राज्यावर शासनाची मेहेरनजर होती. त्याच्या श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन विभागाने तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपयांचा निधी वितरितही झाला होता. तत्कालीन पर्यटनमंत्र्यांच्या कार्यकाळात ३१ मार्च २०१८ रोजी या विकास आराखड्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. या निधीतून सभामंडप: ३६.२० लाख रुपये ,भक्तनिवास: १२.५३ लाख रुपये, ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी महादेवाचा अवतार आहे’ असे भासवून भोंदू अशोक खरात याने एका अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी आणि “तन-मन शांती’साठी विशिष्ट पूजा करण्याच्या बहाण्याने त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी अहिल्यानगर येथील पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारीच (२५ मार्च) तक्रार दाखल केली असून पोलिस तपासात ही भयंकर बाब पुढे आली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5ApRJ6i
भोंदू खरातवर 5 कोटी रुपयांना गंडा घालण्याचाही गुन्हा दाखल:पुण्याच्या व्यावसायिकाला दाखवले होते परिसाच्या शक्तीचे आमिष
March 25, 2026
0