Type Here to Get Search Results !

त्र्यंबकेश्वरची दर्शनरांग 10 तासांची,मात्र दलालांना हजार रुपये देताच थेट प्रवेश:200 रुपयांचे पेड दर्शन पुरातत्त्वकडून बंद

नाशिक महाशिवरात्रीनिमित्त ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी बुधवारी २ लाखांहून अधिक भाविकांची ५ किमीची रांग होती. रांगेतून दर्शनासाठी १० तासांचा वेळ लागत होता. पुरातत्त्व खात्याने पेड दर्शनाला विश्वस्तांना बंदी केली आहे. परंतु, दर्शन एजंट एक हजार ते दोन हजार रुपये उकळून थेट आतल्या रांगेत सोडत होते. पैशांचा रेट हा भाविक कुठला रहिवासी आहे हे भाषेवरून ओळखून त्यानुसार ठरत होता. शीघ्र दर्शनाच्या बतावणीने भाविकांची होतेय लूट मंदिराबाहेरील बजबजपुरीला राेखण्यासाठी विश्वस्त म्हणून अनेक प्रयत्न केले. मंदिरात फलक लावले.पाेलिसांपासून धर्मदाय आयुक्तांपर्यंत याची तक्रार आणि उपाययाेजना दाेन्हीचे प्रस्ताव ठेवले आहेत. प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. - कैलास घुगे, विश्वस्त दर्शन दलालाला फोन पेवरून पैसे देताना ‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी. पाच ते सहा एजंट बिनदिक्कतपणे येथे वावरत होते. त्यांना कुणीही रोखले नाही. आत गेल्यावर तुमचं तुम्ही पाहून घ्या... एजंटची सूचना प्रतिनिधी : भाऊ, दर्शनाला खूप वेळ लागत आहे. कसे करता येईल ? - दर्शन एजंट : तुम्ही किती लाेक आहात? त्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील. प्रतिनिधी : किती पैसे हाेतील, पैसे दिल्यावर दर्शन हाेणार ना नक्की? - एजंट : एकासाठी १००० रुपये लागतील. रांगेत पुढे साेडू. त्यानंतर दाेन तास लागतील. प्रतिनिधी : इथलेच आहोत. काही कमी करा. आॅनलाइन पैसे पाठवले तर चालेल ना? - एजंट : ठीक आहे भाऊ. मग हजारऐवजी तुम्ही ५०० रुपये फाेन पे करा. आत साेडल्यावर जर कुणी काही विचारले तर तुमचे तुम्ही पाहून घ्या. आम्ही जिम्मेदार नाही.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tTehDC7

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.