वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे (३०) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने आकस्मिक निधन झाले. श्रीक्षेत्र देहूगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरीष महाराजांचा नुकताच विवाहसुद्धा ठरला होता. साखरपुडादेखील झाला होता. ३२ लाख रुपयांच्या कर्जापायी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले. चिठ्ठ्या : शिरीष मोरे महाराज त्यांच्या घरात रात्री झोपलेले होते. ते सकाळी ८.३० वा. पर्यंत घराबाहेर आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी दरवाजाची कडी वाजवली व त्यांना आवाज दिला, परंतु आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी घराचा दरवाजा जोरात ढकलून उघडला तेव्हा शिरीष महाराज यांनी छतास असलेल्या फॅनच्या हूकला उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांना आढळून आले, असे देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई-वडील, बहीण, मित्र आणि नियोजित वधूला लिहिलेल्या चार चिठ्ठ्या पोलिसांना मिळाल्या आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OzHjdQc
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराजांची आत्महत्या:32 लाखांच्या कर्जापायी टोकाचा निर्णय, घरातील फॅनला घेतला गळफास
February 05, 2025
0