Type Here to Get Search Results !

दोन कोटींच्या खंडणीसाठी सिडकोतून बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण:घरापासून 100 मीटरवरून पळवले

शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आले. घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून अपहरण झाले. जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता. काळ्या रंगाची चारचाकी आली अन् मुलाला वडिलांसमोर उचलून नेले. ही घटना मंगळवारी रात्री ८.४० वाजता सिडको एन-४ मध्ये घडली. चैतन्य सुनील तुपे (७ वर्षे) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. चैतन्य रात्री वडिलांसोबत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. सिडको परिसरात वडील आणि चैतन्य फिरत होते. तेवढ्यात सेंट्रल मॉल येथून चारचाकीतून तिघे जण उतरले अन् मुलाला सायकलवरून उचलून गाडीत घेऊन गेले. ही चारचाकी आधी जयभवानीनगरकडे गेली नंतर सिडकोमार्गे शहराबाहेर पळून गेले. काय घडले? आराेपींच्या शाेधासाठी १०० फुटेज तपासले

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Oc9orzP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.