विवाहबाह्य प्रेमसंबंध असलेली ३८ वर्षीय महिला व ४१ वर्षीय पुरुषाने गावातील लोकांच्या धमक्यांना त्रासून आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यातील वंजारवाडी (ता. नांदगाव) गावात ही घटना घडली. सुसाइड नोट लिहून नस्तनपूर येथील शनिदेव मंदिराजवळ रेल्वेखाली झोकून देत त्यांनी जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या युगुलाच्या भावनिक सुसाइड नोटमधील मजकूर जशास तसा... शब्दश: सुसाइड नाेट प्रेम करणं हा काही गुन्हा नाही, आम्हाला मरायचं नव्हतं... जगायची खूप इच्छा हाेती... पोलिस स्टेशन मनमाड व आमदार साहेब सुहास अाण्णा कांदे यांना व आपणास कळविण्यात येते की... मी कमला (नाव बदलले) व ज्ञानेश्वर माधव पवार (वंजारवाडी). आमच्या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण प्रेम करणे गुन्हा नाही. आम्ही कुणाला त्रास दिला नाही. पण खाली दिलेल्या नावांमधील लोकांनी १५ ते २० दिवसांपासून आम्हाला जिवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत. आत्महत्या करण्यास या लोकांनी प्रवृत्त केले. तुम्ही आत्महत्या नाही केली तर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली व सांगितले की, आमदार साहेब व संजय पवार, नागापूर व अधिकारी आमच्या बाजूने आहेत. तुम्हाला मारून टाकले तरी कोणीही आमचे वाकडे करणार नाही, अशी धमकी दिली. १५ ते २० दिवसांपासून हे लोक आमच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यामुळे आम्ही आत्महत्या केली. याची पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा. आम्हाला मरायचं नव्हतं. जगण्याची खूप इच्छा हाेती पण या लाेकांनी धमकी दिल्यामुळे नाईलाज झाला. या लाेकांची पाेलिसांनी व आमदार साहेबांनी चाैकशी करावी, आमदार साहेब, तुमची बहीण मारली या लाेकांनी. या लोकांनी धमकी दिल्याचा चिठ्ठीत केला आरोप पोलिसांनी सर्व आरोपींवर कारवाई करावी : आ. कांदे ‘दिव्य मराठी’शी बोलताना नांदगावचे आमदार सुहास कांदे म्हणाले, ‘या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही याकडे आम्ही स्वत: लक्ष घालून पाठपुरावा करणार आहोत.’ महिलेने भावाला सुसाइड नोट पाठवून दिला जीव महिलेने मंगळवारी रात्री ८.५० ला येवल्यातील भाटगाव येथे राहणाऱ्या भावाला व्हॉट्सॲपवर सुसाइड नोट पाठवली. त्यानंतर भाऊ व नातेवाईक मनमाड ठाण्यात तक्रार देण्यास गेले. मात्र, युगुलाने तोपर्यंत आत्महत्या केल्याची माहिती तेथे त्यांना मिळाली. पोलिसांकडून दखल... आत्महत्या करणारा मुलगा नात्यातला आहे. ते त्याचे खासगी जीवन होते. चिठ्ठीत आपल्यावर आरोप नाही, तर न्यायाची मागणी केलीय. पोलिसांनी दखल घेतलीय. - संजय पवार, नागापूर
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SCajFUw
आमदार साहेब, तुमची बहीण मारली या लोकांनी...:नाशिक जिल्ह्यातील वंजारवाडी गावची 38 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुषाला संबंध तोडण्याच्या धमक्या; त्रस्त विवाहित युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
March 12, 2025
0