Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात तापमान 2 ते 3 अंशांनी घसरले,3 दिवस पावसाचे:संभाजीनगरमध्ये वाऱ्याने कारवर झाड पडल्याने जि.प. अधिकाऱ्याचा मृत्यू

वादळी वाऱ्याने कारवर झाड पडून बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लेखाधिकारी राजू भास्करराव चित्ते (५३, रा. साई वृंदावन कॉलनी, पैठण रोड) यांचा मृत्यू झाला. मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील एम्प्लॉयमेंट ऑफिससमोर ही घटना घडली. चेलिपुरा कार्यालयात कार्यरत असलेल्या चित्ते यांच्या पत्नी घाटीत लॅब टेक्निशियन आहेत. त्यांना भेटण्यासाठी जात असताना ही घटना घडली. चित्तेंचा मुलगा आयआयटी दिल्लीत शिकत असून मुलगी सातवीत आहे. दरम्यान, बुधवारी जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. नाशिकमध्ये कांद्याला फटका बसला. पावसाचा महाराष्ट्रातील मुक्काम ३ दिवस वाढला आहे. पुढील ४८ तासांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होणार आहे. नाशिकला २०० झाडे कोसळली छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव तर जालना जिल्ह्यात अंबड तालुका मुंबई, ठाणे, बुलडाणा येथे पावसाने हजेरी लावली. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरात तुफानी वाऱ्याने दोनशेहून अधिक झाडे कोसळली. निम्म्या शहरात चार ते चौदा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. दहा ठिकाणी झाडे मोडल्याने वाहनांचे तर १७६७.२५ हेक्टरवर पिकांचे पावसाने नुकसान झाले. जळगाव जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने चाळीसगाव, धरणगाव, पाराेळा, एरंडाेल, रावेर, चाेपडा आणि यावल तालुक्यात ७२३५ हेक्टरवर केळीचे माेठे नुकसान झाले. मुंबईच्या डबेवाल्यासह तिघांचा मृत्यू कल्याण येथे गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालकासह दोघांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. यातील जखमी मुंबईचे डबेवाले तुकाराम खेंगळे यांचा मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील कलमाडी येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासून बुधवारी रात्रीपर्यंत मुंबईच्या शहरी भागात (कुलाबा) ३ आणि उपनगरात २१ मिमी पावसाची नोंद झाली होती. संभाजीनगर, बीडला ऑरेेंज अलर्ट छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ८ मे राेजी काेकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/WA268lJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.