Type Here to Get Search Results !

लोढा ग्रुप फसवणूक प्रकरणात ईडीची एन्ट्री:मनसे नेत्याच्या भावाची 10 तास चौकशी, राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटलांच्या अडचणीत वाढ

मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांची लोढा ग्रुपच्या विश्वस्त फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल दहा तास चौकशी केली. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. दरम्यान, विनोद पाटील यांची ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता असून, त्यांना लवकरच चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि मनसे नेते राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्यासह एकूण दहा जणांवर दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असताना आता अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात प्रवेश केला आहे. ईडीने आज विनोद पाटील यांची तब्बल दहा तास चौकशी केली. काय आहे प्रकरण? लोढा ग्रुपच्या विश्वस्त फसवणूक प्रकरणात मनसे नेते राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू झाली आहे. लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यासह दहा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना, आता राजेंद्र लोढा यांनी केलेल्या जमीन आणि टीडीआरच्या आर्थिक गैरव्यवहारासंबंधीचा समांतर तपास ईडीकडे आला आहे. लोढा ग्रुपच्या विश्वस्तांचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र लोढा यांच्यानंतर आता विनोद पाटील यांचीही चौकशी ईडीने सुरू केली आहे. ईडीचे पथक विनोद पाटील यांचा जबाब घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान, विनोद पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, त्यांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4ealf3q

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.