गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवा ट्विस्ट समोर आला आहे. राज्य शासनाने २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजवंदनासाठी अधिकृत यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे रायगडमध्ये यापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांना जो मान दिला जात होता तो यंदा भरत गोगावलेंकडे गेल्याने तटकरेंना मोठा झटका बसला आहे, तर नाशिकमध्येही दादा भुसे यांची नाराजी बाजूला सारत गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजवंदनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, यंदाच्या वर्षी गोगावले रायगडमध्ये ध्वजवंदन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे. गोगावलेंची वारंवार नाराजी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यापासून शिंदेसेनेचे भरत गोगावले आक्रमक झाले होते. “रायगडवर आमचा दावा आहे,’ असे म्हणत त्यांनी आपली नाराजी वारंवार बोलून दाखवली होती. १ मे महाराष्ट्रदिनी नाशिकमध्ये गिरीश महाजन, तर रायगडमध्ये महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडले होते. प्रत्येक वेळी शासकीय सोहळ्यांमध्ये तटकरे यांना मिळणाऱ्या मानामुळे शिंदे गटात अस्वस्थता होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/9IgZjiT
रायगडात यंदा प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाचा मान गोगावलेंना:यापूर्वी कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांना होता मान
January 21, 2026
0