केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २०१४ ते २०२६ या १२ वर्षांत कर हस्तांतरण आणि अनुदानरूपात ९.४९ लाख कोटी रुपये मिळाले. यामध्ये ५.८३ लाख कोटी रुपये कर हस्तांतरण तर ३.६६ लाख कोटी रुपये केंद्र अनुदानाचे आहेत. केंद्र-राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला ८९,८५५.८० कोटी रुपयांचा कर वाटा येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २००९-१४ मध्ये वार्षिक सरासरी केवळ १,१७१ कोटी रुपये मिळत होते. २०२४-२५ मध्ये ही तरतूद १५,९४० कोटींवर पोहोचली. ही १३ पट वाढ आहे. राज्यात सध्या ८१,५८० कोटींचे ४१ रेल्वे प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद : एका नजरेत
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/8bAI7fB
केंद्राकडून महाराष्ट्राला 12 वर्षांत 9.49 लाख कोटी रुपयांचा निधी:केंद्रीय अर्थसंकल्पातून तपशील आला समोर
February 03, 2026
0