Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा:3 महिन्यांची एकत्रित 116.69 कोटींची रक्कम थकीत

‘राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून आलेल्या रकमेबरोबर वाढीव वेतनाचा फरक देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, संबंधित रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मंगळवार १० फेब्रुवारीपर्यंत वाढीव वेतनाचा फरक न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन केले जाईल,’ असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी दिला आहे. एकीकडे महामंडळावर सुमारे ४२०० कोटींची वैधानिक देणी थकीत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा हप्ता न देणे ही सरळ अवहेलना असल्याचे हट्टेवार यांनी स्पष्ट केले. मंगळवार, १० फेब्रुवारीपर्यंत वाढीव वेतन फरकाची रक्कम न मिळाल्यास रीतसर नोटीस देऊन एसटी कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा ठाम परिवहनमंत्री यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून कामगार वर्गात रोष असल्याचे कळवले. त्यावर सरनाईक यांनी मंगळवारी १२० कोटींची फाइल कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतो, असे सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PrwbKsQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.