Type Here to Get Search Results !

मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; आजपासून चाचणी:स्कोअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे निर्माण झाला होता अडथळा

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. ढोरकीनजवळील स्कोअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे निर्माण झालेला अडथळा दूर झाला असून दुरुस्ती पूर्ण झाली आहे. रविवारी रात्रीपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण होणार असल्याने सोमवारी (१३ एप्रिल) सकाळी नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही चाचणी धनगाव, ढोरकीन, बिडकीन आणि फारोळा असे टप्पे पार करत निसर्ग नर्सरीपर्यंत पोहोचली होती. आज रात्रीपर्यंत काम पूर्ण

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/TrQVh5C

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.