वेरूळ येथील अभ्यागत केंद्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) खासगी एजन्सीकडे चालवण्यासाठी दिले होते. मात्र, एजन्सी तोट्यात गेल्याने हे केंद्र बंद पडले होते. त्यानंतर एमटीडीसीने २ वेळा निविदा प्रक्रिया राबवली; परंतु एकही एजन्सी पुढे आली नाही. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एमटीडीसी स्वतःच अभ्यागत केंद्र चालवणार आहे. यासाठी मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली असून साफसफाईलाही सुरुवात झाली आहे. राज्य सरकार आणि जपान सरकारच्या करारातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत (एमटीडीसी) अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी अभ्यागत केंद्र उभारण्यात आले. वेरूळ लेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या या केंद्रासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन २०१४ मध्ये झाले होते. २०१४ ते २०१७ दरम्यान हे केंद्र सरकारकडून चालवले गेले. मात्र, देखभालीचा (मेंटेनन्स) खर्च वाढल्याने ते बंद करण्यात आले. जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ४.५० कोटी रुपये खर्च करून केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर एमटीडीसीने हे केंद्र खासगी एजन्सीकडे चालवण्यासाठी दिले, परंतु एजन्सी तोट्यात गेल्याने पुन्हा बंद झाले. केंद्र सुरू करण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली. मात्र एकही एजन्सी पुढे आली नाही. त्यामुळे हे केंद्र दीर्घकाळ बंदच राहिले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनांनंतर एमटीडीसीने हे केंद्र स्वतः सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यापूर्वी हे केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. अभ्यागत केंद्राची वैशिष्ट्ये साफसफाईला सुरुवात कुंभमेळ्यापूर्वी अभ्यागत केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. खासगी एजन्सी पुढे येत नसल्याने मॅनेजरची नियुक्ती करून साफसफाई सुरू केली आहे. केंद्र सुरू होईपर्यंत एजन्सीच्या प्रतीक्षेत आहोत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3uVFba7
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:वेरूळ येथील अभ्यागत केंद्र एमटीडीसी स्वतः चालवणार; आठ एकरांवर उभारलेले केंद्र, कैलास लेणीची प्रतिकृती पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण
May 03, 2026
0