Type Here to Get Search Results !

खंडाळ्यात ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर:17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित, राजकीय हालचालींना आला वेग‎

खंडाळा ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १२ जून रोजी खंडाळा येथील ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सोडतीमध्ये एकूण १७ जागांपैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांच्या राजकीय स्वप्नांवर पाणी फेरले आहे. अध्यादेश अधिकारी एन. बी. कुसनुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. यावेळी २०११ च्या जनगणनेचा आधार घेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला व पुरुषांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी भीमराज दाणे, ग्राम महसूल अधिकारी सुखदेव राठोड, प्रशासक कौशाबाई थोरात, पोलिस पाटील नितीन बागुल, माजी सरपंच उत्तमराव पवार, संजय जेजुरकर, अब्दुल रहमान कुरेशी, सुधाकर बागुल, राजू बागुल, बाळासाहेब मिसाळ, बाबू खासाब, विलास पवार, संजय सूर्यवंशी, विजय मगर, रहीम बागवान, अक्रम पठाण, शिवराज पैठणकर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खंडाळा गावची ११ हजार लोकसंख्या ः खंडाळ्याची लोकसंख्या ११,३८५ असून, अनुसूचित जाती १,७१७, अनुसूचित जमाती ५९३ अशी संख्या आहे. प्रभाग १ नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष), अनुसूचित जाती (पुरुष), सर्वसाधारण (महिला). प्रभाग २ नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष), सर्वसाधारण (पुरुष), सर्वसाधारण (महिला). प्रभाग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण (पुरुष). प्रभाग ४ सर्वसाधारण (पुरुष), अनुसूचित जाती (महिला). प्रभाग ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), अनुसूचित जमाती (पुरुष), सर्वसाधारण (महिला). प्रभाग ६ सर्वसाधारण (पुरुष) आणि २ सर्वसाधारण महिला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/zeAO1aX

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.