Type Here to Get Search Results !

तिवसा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर:कान, नाक, घसा, दमा आणि नेत्रविकारांची तपासणी

तिवसा येथील गौरखेडेपुरा येथील आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. या शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक आणि घसा यांसारख्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या तपासणीदरम्यान मोतीबिंदू, काचबिंदू आणि इतर नेत्रदोषांविषयी माहिती देण्यात आली. काही रुग्णांची संगणकीय यंत्राद्वारे फुफ्फुसांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधेही मोफत वाटण्यात आली. श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. परीक्षित ठाकरे, नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. दिशा ठाकरे आणि कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. तेजल सोलार (लाखेकर) यांनी या शिबिरात वैद्यकीय सेवा दिली. त्यांनी रुग्णांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शनही केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश प्रमोदराव देशमुख, श्रेयश देशमुख, डॉ. रितेश गोरे (फिजिओथेरपिस्ट), सूरज तंवर, मयूर वानखडे, विजय बांते, भूषण मुंदाणे, सुमित अनासने, ऋतिक देशमुख, भाग्येश गौरखेडे, अक्षय रोडगे, रोहन वानखडे, सूरज गौरखेडे, दिनेश लोहकरे, प्रथमेश गौरखेडे, यश गौरखेडे, कुणाल गौरखेडे, अक्षय तायवाडे, अंश शिकरे, आकाश कोसे आणि विक्रांत ठाकरे यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतला. आयोजकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Akslb3V

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.