Type Here to Get Search Results !

मूल सांभाळण्याचे वचन देत गर्भवतीवर अत्याचार:प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचा आरोप

हर्सूल परिसरात राहणाऱ्या २४ वर्षांच्या विवाहितेचा २ महिन्यांची गर्भवती असताना पतीशी वाद झाला. त्यामुळे दोघे विभक्त राहू लागले. ही बाब ती कामाला असलेल्या ठिकाणच्या एकाने हेरून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व मूल सांभाळण्याचे वचन देत वारंवार अत्याचार केले. मात्र, लग्नाचा तगादा लावल्यावर आरोपीचे लग्न झाले असल्याचे समोर आले. हा प्रकार मे २०२५ ते मे २०२६ या काळात घडला. याप्रकरणी शाहिद कय्युम सय्यद (२७, रा. शिवाजीनगर) याच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. विवाह झाल्यावर शहरात राहण्यासाठी आलेल्या २४ वर्षांच्या मुलीचे सातत्यने पतीशी खटके उडत होते. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. याच काळात तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी तिची ओळख शाहिदसोबत झाली. तो मदतीच्या बहाण्याने सातत्याने तिच्या रूमवर यायचा. तिला सातवा महिना सुरू असताना आरोपीने, ‘मी तुझ्या मुलाला माझे नाव देईल. लग्नदेखील करेल,’ असा विश्वास दाखवला. त्या वेळी सात महिन्यांची गर्भवती असताना शाहिदने तिच्यावर अत्याचार केला. मुलगी झाल्यावर अत्याचार जुलै २०२५ मध्ये पीडितेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर दीड महिन्यानंतर त्याने पुन्हा वारंवार तिच्या रूमवर जात अत्याचार केला. याच काळात शाहिदच्या घरी यांच्या प्रेमसंबंधांच्या बाबतीत कळले. त्यामुळे त्यांनी यांच्या प्रेमाला विरोध केला. तेव्हापासून त्याने संपर्क कमी केला. आधीच लग्न झाल्याचे लपवले शाहिदच्या घरी प्रेमसंबंधाबाबत कळले. त्यानंतर पीडितेने चौकशी केल्यावर त्याचे लग्न झालेले असल्याचे समोर आले. त्यामुळे आधीच लग्न झालेले असूनदेखील त्याने पीडितेला लग्नाचे व मुलीला सांभाळण्याचे वचन दिले. मात्र, त्यानंतर त्याने पीडितेला कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही. याचा पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/XvZEn8i

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.