प्रशासनात सध्या “सत्यमेव जयते’ऐवजी “नोटमेव जयते’ सुरू आहे. हवा, पाणी आणि माती दूषित करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींनी आता संपूर्ण प्रशासनच दूषित केले आहे, असा थेट हल्ला भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवरून त्यांनी आपल्या खास शैलीत सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोषी अधिकाऱ्यांवर महिनाभर उलटूनही कारवाई न झाल्याने मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “महिना-महिनाभर प्रशासन झोपून असेल, तर यांच्यात कुंभकर्णाचा डीएनए आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. महामाया कोल वॉशरीकडून झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाढा वाचत, त्यांनी बाधित शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत ६८ लाख रुपयांची मदत देण्याची आग्रही मागणी केली. प्रदूषणाची दाहकता मी जवळून अनुभवली- पंकजा मुंडे म्हणाल्या, “थर्मल पॉवर स्टेशनचे ऑडिट करण्याची सूचना अत्यंत योग्य असून, सरकार आधीच त्या मार्गावर आहे. “फ्लाय ॲश’चा (राख) मुद्दा अत्यंत गंभीर आहे. मी स्वतः थर्मल पॉवर स्टेशन असलेल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिथल्या प्रदूषणाची दाहकता जवळून अनुभवली आहे. यावर योग्य ते ऑडिट होईल. बीडच्या मंत्र्यांकडून स्पीडची आहे अपेक्षा विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत मुनगंटीवार म्हणाले, “तुम्ही दमदार आहात, बीडच्या मंत्र्यांकडून आता “स्पीड’ ची आवश्यकता आहे. या प्रकरणात जे जे दोषी आहेत, त्यांचा बंदोबस्त करा आणि “मुंडे पॅटर्न’ काय असतो ते दाखवून द्या, अशी अपेक्षाही या वेळी मुनगंटीवार यांनी या वेळी व्यक्त केली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/nKB8vVN
‘फ्लाय ॲश’चा मुद्दा गंभीर; थर्मल पॉवर स्टेशन्सचे ऑडिट करणार- मुंडे:‘सत्यमेव जयते’ऐवजी ‘नोटमेव जयते’ सुरू; मुनगंटीवारांचा प्रशासनावर हल्ला
June 25, 2026
0