Type Here to Get Search Results !

साई मंदिरासमोर फळविक्रेत्या‎ महिलेचा चाकू भोसकून खून‎:व्यवसायाच्या जागेच्या जुन्या वादातून हल्ला; 2 तरुणी अटकेत‎

शिर्डीतील श्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ‎४ समोर रविवारी रात्री शेजारतीपूर्वी एक‎धक्कादायक घटना घडली. व्यवसायाच्या‎जागेच्या जुन्या वादातून एका फळविक्रेत्या‎महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या‎करण्यात आली. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी‎कारवाई करत दोन तरुणींना अटक केली‎आहे. ही घटना मंदिर परिसरातील‎सीसीटीव्हीत कैद झाली आहे.‎ जयश्री साईनाथ क्षिरसागर (वय २९, रा.‎बाजारतळ, शिर्डी) असे मृत महिलेचे नाव‎आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या‎जयश्री यांच्यावर श्री साईबाबा सुपर‎स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते,‎मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान‎त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पती‎आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.‎ मृत जयश्री या मंदिर परिसरात काकडी व‎कैरी विक्रीचा व्यवसाय करायच्या. तर‎संशयित आरोपी अंजली खंडीझोड (वय २२,‎रा. कालिकानगर) ही साईबाबांचे फोटो‎विक्रीचा व्यवसाय करते. व्यवसायाच्या‎जागेवरून चार ते पाच महिन्यांपूर्वी दोघींमध्ये‎वाद झाला होता. रविवारी रात्री अंजलीच्या‎सांगण्यावरून तिची मैत्रीण फिजा उर्फ‎नोझिया लुकमान पटेल (वय २१, रा.‎कालिकानगर) ही जयश्री यांच्याशी वाद‎घालण्यासाठी आली. जयश्री एकट्या‎असल्याचे पाहून फिजाने त्यांच्यावर धारदार‎चाकूने वार केले. मध्यस्थी करणाऱ्या इतर‎महिलांनाही आरोपींनी दमदाटी केली.‎ घटनेची माहिती मिळताच पोलिस‎उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस‎निरीक्षक रणजित गलांडे आणि उपनिरीक्षक‎सागर काळे यांनी पथकासह घटनास्थळी‎धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत महिलेचे पती साईनाथ‎क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी‎भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल‎केला असून, दोन्ही आरोपी महिलांना बेड्या‎ठोकल्या आहेत.‎ साई मंदिर परिसरातील संस्थानच्या सीसीटीव्ही‎कॅमेऱ्यांत हल्ल्याची संपूर्ण थरारक दृश्ये कैद झाली‎आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी घटनेचा‎संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट केला असून, तपासात हा‎सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार‎आहे.शिर्डीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन‎करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी.‎कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सातत्य ठेवून गुन्हेगारांवर‎वचक निर्माण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला‎दिल्या आहेत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे‎पाटील यांनी सांगितले.‎

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/JTSF9CD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.