राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती, पदोन्नती प्रक्रियेतील नवीन अटी तसेच विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध करत हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात राज्यातील शिक्षक संघटना सहभगी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. संघटनांच्या प्रमुख मागण्या शिक्षकांसाठी टीईटी पात्रतेची अट स्थगित करावी, १४ मे रोजीचा पदोन्नतीसंदर्भातील आदेश मागे घ्यावा, विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेतील शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी, सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना तातडीने पदोन्नती द्यावी.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/lwyVN5t
टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा
July 06, 2026
0