Type Here to Get Search Results !

पंढरपुरात सुरक्षेवर तैनात असलेल्या गंगाखेडच्या जवानाची आत्महत्या:शासकीय महापूजेच्या सुमारास सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी जमा झालेली असतानाच एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे जीवनयात्रा संपवलेल्या जवानाचे नाव आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा भाग म्हणून परभणी येथून एसआरपीएफची तुकडी पंढरपुरात दाखल झाली होती. शनिवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू असतानाच, पंढरपूर-कासेगाव रस्त्यावरील आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी जवान रामेश्वर साबणे यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा तीव्र आवाज होताच परिसरात तैनात इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धावले. गोळी वर्मी लागल्यामुळे रामेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला होता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/zi08vNC

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.