गंगापूर छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भेंडाळा गावाजवळील रॉयल पॅलेस हॉटेलसमोर हा अपघात घडला. रितेश राजेश राठोड (२३) आणि अविनाश केशव चव्हाण (२४, दोघे रा. गोसावी पांगरी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही तरुण (एमएच २१ सीएल ६७७१) क्रमांकाच्या दुचाकीवरून पुण्याकडे रोजगारासाठी निघाले होते. मात्र, भेंडाळाजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली. पुढे चाललेल्या आयशर वाहनाचा अंदाज न आल्याने त्यांच्या भरधाव दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आणि दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय केंद्रे यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. महामार्गावरील अतिवेग आणि अपुऱ्या उपाययोजनांमुळे आणखी दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोघेही तरुण नोकरीसाठी पुण्याला दुचाकीवरून जात होते. मात्र, भेंडाळा गावाजवळ त्यांच्या दुचाकीने आयशरला धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. अविनाश चव्हाण रितेश राठोड
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/yHLiVqn
भेंडाळा गावाजवळ अपघात;गोसावीपांगरी येथील दोघे ठार:दुचाकीची आयशरला मागून धडक, नोकरीसाठी दोघेही निघाले होते पुण्याला
July 18, 2026
0