एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी ८ डिसेंबर २०११ रोजी नांदेड येथील सभेत प्रभू श्रीराम, माता कौसल्या यांची टिंगलटवाळी करणारी विधाने केली होती. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि २९८ अन्वये दाखल असलेला गुन्हा आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला. न्या. आर. एम. जोशी यांनी ओवेसींची याचिका फेटाळून लावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी निकालाचा संदर्भ देत ओवेसींनी केलेले वक्तव्य घाईगडबडीत किंवा अनवधानाने केलेले नसून नियोजित, पूर्वग्रहदूषित आणि एका विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने केलेले होते. त्यावर अर्जदाराने आक्षेप घेतला होता. हायकोर्ट निर्णयामुळे नियमित खटला चालेल
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/yxXldrY
श्रीरामाविषयी अकबरुद्दीन ओवेसींचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित; समन्स रद्दला कोर्टाचा नकार:8 डिसेंबर 2011 रोजी नांदेडच्या सभेत केली होती रामासह कौसल्येची टिंगलटवाळी
August 12, 2026
0