Type Here to Get Search Results !

सोयगाव तालुक्यात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात

यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. शेतीचा विश्वासू साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण सोयगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात पारंपरिक पद्धतीने, उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. बैलांना रंगीबेरंगी सजावट करून सन्मानाने पोळ्याच्या मिरवणुकीत सहभागी करण्यात आले. सोयगाव येथे पोळ्यानिमित्त पारंपरिक तोरण लावण्याची प्रथा यंदाही कायम ठेवण्यात आली. जुन्या ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार प्रथम तोरण लावण्यात आले. त्यानंतर नंदीबैलांसह सजविलेल्या बैलांना तोरणाखालून नेण्यात आले. पुन्हा तोरण लावल्यानंतर सर्व नंदीबैल तोरणाखालून गेल्यावर पोळा फुटल्याचे जाहीर करण्यात आले. गावातील शेतकरी, बैलमालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेतील शेतकरी, रंगीबेरंगी सजावट केलेले बैल आणि उत्साही ग्रामस्थ यामुळे परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. पावसाचे प्रमाण कमी असतानाही शेतीच्या साथीदारांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा जपण्याचा शेतकऱ्यांचा उत्साह विशेष जाणवत होता. पोलिसांकडून चोख बंदोबस्त पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित काईगडे व पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन आरेकर, सोयगाव बीट जमादार ज्ञानेश्वर दांडगे, नारायण जिरी, संदीप सुसर, राजू बर्डे, गजानन दांडगे, अजय कोळी, राजू सोनवणे, सादिक तडवी यांच्यासह पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी बंदोबस्त ठेवला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tcAeWX9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.