Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून वाद:गणेशभक्त-पोलिसांमध्ये बाचाबाची; मारहाणीत एक जखमी

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात काल विसर्जन मिरवणुकांचा मोठा उत्साह पाहायला मिळला. मात्र, या उत्साहाला गालबोट लागणारी एक घटना समोर आली आहे. गुलाल उधळण्याच्या कारणावरून पोलिस आणि गणेश भक्तांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेत एक गणेश भक्त जखमी झाला असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमके काय घडले? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीत भक्तांकडून मोठ्या उत्साहात गुलाल उधळला जात होता. याचवेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत भक्तांचा वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर अल्पावधीतच शाब्दिक बाचाबाचीत झाले. परिस्थिती नियंत्रणात आणताना एपीआय (API) मनोज यांनी कारवाईला सुरुवात केली. स्टेजवरून 'मारू नका'चे आवाहन पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचा हा सर्व प्रकार रामेश्वर भादवे स्वतः पाहत होते. त्यांनी माईकवरून अनाउंसमेंट करत "कृपया गणेश भक्तांना मारू नका," असे आवाहन केले. मात्र, तरीही काही काळ गोंधळाची परिस्थिती कायम होती. एक भक्त जखमी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रेवण सोनवणे नावाचा गणेश भक्त जखमी झाला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीतील गणेश भक्तांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचे काही व्हिडिओ.. या घटनेबाबतचे सविस्तर अपडेट्स लवकरच दिले जातील...

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/t6CcMEQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.