चित्रपट निर्मितीच्या नावाखाली परदेशात कथितरीत्या कोट्यवधी रुपयांचा निधी वळवणे आणि मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून आयकर विभागाने बॉलीवूडवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईतील तब्बल १२ ठिकाणांवर आयकर विभागाच्या विविध पथकांनी एकाच वेळी शोधमोहीम राबवली. या कारवाईच्या केंद्रस्थानी चित्रपट निर्माता वासू भगनानी, रकुल प्रीत सिंग आणि पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित आस्थापने आहेत. मुंबई आयकर विभागाच्या पथकांनी पोलिसांच्या बंदोबस्तात सकाळी ६ वाजताच ही कारवाई सुरू केली. उच्चभ्रू पाली हिल परिसरातील पूजा कासा या भगनानी कुटुंबीयांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. तिथे वासू भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या घरासह कार्यालयांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय, पॅनोरमा स्टुडिओच्या मुंबईतील मुख्य कार्यालयावरही पथकाने छापे टाकून झाडाझडती सुरू ठेवली आहे. संशयाची सुई नेमकी कुठे? परदेशात निधी हस्तांतरण: चित्रपट निर्मिती व वितरणाच्या नावाखाली परदेशात संशयास्पद रीतीने मोठी रक्कम वळवल्याचा संशय.
बोगस खर्चाच्या नोंदी: आंतरराष्ट्रीय शूटिंग आणि परदेशी तंत्रज्ञांच्या मानधनाचा फुगवटा दाखवून करचुकवेगिरी झाली का, याचा शोध.
डिजिटल पुरावे : हार्डडिस्क, सर्व्हर आणि आर्थिक नोंदी जप्त करून फॉरेन्सिक तपासणी सुरू. यातून हवाला किंवा विदेशी शेल कंपन्यांशी संबंध उघड होण्याची शक्यता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/au4wEo9
करचुकवेगिरीच्या संशयावरून ‘पॅनोरमा’, भगनानी कुटुंबावर ‘आयकर’चे छापे:रकुल प्रीत व वासू भगनानींच्या मुंबईतील निवासस्थानांवर छापे
September 28, 2026
0