शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक, सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. बाजार समितीने केवळ पारंपरिक पद्धतीने काम न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून बाजारपेठेतील व्यवहार अधिक सुलभ, गतिमान आणि शेतीपूरक करण्यावर भर दिला पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५-२६ समितीच्या मुख्य आवारात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत व सभापती सतीश हरिदास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ सप्टेंबर रविवार रोजी उत्साहात पार पडली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. पुढे बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी आणि बाजार समिती प्रशासन हे बाजार व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. या सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास बाजार समितीचे काम अधिक गतिमान आणि प्रभावी होते. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सत्तार यांनी केले. तसेच जिल्हा बँक व शासनाच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर दुधाळ गायींचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती तथा संचालक केशवराव तायडे व सभापती सतीश ताठे यांनी केले. बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन करत अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, श्रीराम महाजन, राजेंद्र ठोंबरे, देविदास पाटील लोखंडे, उपसभापती अनुसयाबाई मोरे, केशव तायडे, दारासिंग चव्हाण, विश्वास दाभाडे, संदीप राऊत, दामू गव्हाणे, जयराम चिंचपुरे,नंदकिशोर सहारे, राजाराम पाडळे, रमेश लाठी, भाऊराव लोखंडे, नरसिंग चव्हाण, संजय डमाळे, सुदर्शन अग्रवाल, अंबादास शिंदे, प्रशांत क्षीरसागर, किशोर अग्रवाल, राजु गौर, विशाल जाधव, प्रमोद शिंदे, मोतीराम पाडळे, एकनाथ शिंदे, नासेर पठाण, रमेश ठाकूर यांच्यासह शेतकरी, व्यापारी व उपस्थित होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6tHs7wR
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कृ.उ.बा. समितीचा कारभार पारदर्शक करा- आ.सत्तार:सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
September 27, 2026
0