Type Here to Get Search Results !

शासकीय दंत महाविद्यालयात सर्वसमावेशक दंतचिकित्सालय सुरू:दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना एकाच छताखाली मिळणार उपचार: अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक सर्वसमावेशक दंतचिकित्सालय (कॉम्प्रेहेन्सिव्ह डेंटल क्लिनिक) सुरू करण्यात आले आहे. अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. या नवीन सर्वसमावेशक दंतचिकित्सालयात प्रगत आणि मल्टी स्पेशालिटी दंत उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे केंद्र विशेषतः दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या विशेष गटातील दंतरुग्णांना शक्य तेवढे सर्व उपचार एकाच चिकित्सालयात उपलब्ध होणार आहेत. यामुळे त्यांना विविध विभागांच्या चिकित्सालयात जाण्याची गरज पडणार नाही आणि त्यांच्या प्रतीक्षा वेळेत मोठी घट होईल. यावेळी अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर यांनी आरोग्य सेवा आणि दंतवैद्यकीय शिक्षणातील पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. सर्व विभागाच्या प्रमुखांनी नवीन चिकित्सालयाचे कामकाज अधिक गतिमान आणि सोपे करण्यासाठी आपापल्या विभागाचा क्लिनिकल रोडमॅप सादर केला. विविध दंत उपचार विभागांमध्ये चांगला समन्वय साधून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यावर सर्वांनी भर दिला. दंतोपचार सुविधांच्या या विस्तारामुळे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय हे राज्यातील रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेचे एक आदर्श मॉडेल म्हणून समोर आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिकित्सालयाचे समन्वयक डॉ. विपुल दिवाण, श्री. मुकेश भोसले, ब्रदर श्री. गोविंद नखाते आणि श्री. विशाल नारायणकर यांनी परिश्रम घेतले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/kYfdwej

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.