Type Here to Get Search Results !

विद्यार्थिनीला कॉल करत अश्लील वर्तन; संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल:पोलिस भरती क्लासच्या बहाण्याने संपर्क साधून केले गैरकृत्य

पोलिस भरतीपूर्व वर्गाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षांच्या तरुणीला वारंवार फोन करत, व्हिडिओ कॉलवर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टीव्ही सेंटर परिसरातील नवजीवन अकॅडमीचा संचालक शिंदे याच्याविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील एका २१ वर्षांच्या तरुणीने ११ सप्टेंबर रोजी टीव्ही सेंटर येथील नवजीवन अकॅडमीमध्ये पोलिस भरतीच्या क्लासबाबत चौकशी केली होती. त्यावेळी तिची भेट क्लासचा संचालक शिंदे याच्याशी झाली. त्याने तिला डेमो क्लास करण्याचे सुचवले. त्यानुसार तरुणीने एक दिवस क्लास केला. मात्र तो शिक्षक नसून मालक असल्याचे समजल्याने ती पुन्हा क्लासला गेली नाही. १६ सप्टेंबर रोजी शिंदे याने व्हिडिओ कॉल करून अश्लील संवाद साधला. किती पैसे पाहिजेत ते सांगा या घटनेनंतर १८ सप्टेंबर रोजी दुपारी पीडित तरुणीच्या आईने स्वतः संचालक शिंदे याला फोन करून जाब विचारला. तू माझ्या मुलीला असे का बोललास? अशी विचारणा केली असता, आपली चूक मान्य करण्याऐवजी त्याने उर्मटपणे उत्तर दिले. मला ब्लॅकमेल करू नका, तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा, असे म्हणत त्याने पीडितेच्या आईलाच धमकी दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/78hJrbY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.