Type Here to Get Search Results !

बोपदेव घाटात थरार!:टेम्पोच्या धडकेने कार दरीत कोसळली; चालक बचावला, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बोपदेव घाटात कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मोटारीला धडक दिली. मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार दरीत कोसळली. दैव बलवत्तर होते म्हणून मोटार चालक बचावला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शिवाजी विठ्ठल भोसले (वय 45, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालक शिवाजी भोसले हे कोंढव्यातील बोपदेव घाटातून मध्यरात्री बाराच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने (पिकअप) मोटारीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर मोटार चालक भोसले यांचे नियंत्रण सुटले. मोटार दरीत कोसळली. दरीतील उतारावर मोटार अडकली. सुदैवाने या घटनेत मोटार चालक भोसले यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्या हाताला खरचटले. अपघातानंतर मोटार चालकाला कोणतीही मदत न करता टेम्पो चालक पसार झाला. पोलिस उपनिरीक्षक एस खराडे तपास करत आहेत. मद्यालयातील कामगाराला मारहाण मद्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याने कामगाराला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपीने कामगाराला बाटली फेकून मारल्याने त्याच्या भुवईला जखम झाली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अंकित बलेश्वर पांडे (वय 22, रा. ससाणेनगर रस्ता, हडपसर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यालयात आला. आरोपीने मद्याची बाटली मागितली. पांडे याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपीने पांडे याला मद्याची बाटली फेकून मारली. बाटली भुवईजवळ लागल्याने दुखापत झाली. हवालदार एस तरडे तपास करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZUGvo4c

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.