Type Here to Get Search Results !

मोठ्या बँकांत दुचाकी कर्ज कठीण:ग्रामीण ग्राहकांवर 26 टक्के व्याज भरण्याची वेळ

देशातील मोठ्या सरकारी बँकांत टू व्हीलर लोन मिळणे कठीण होत चालले आहे. कारण लहान-मोठ्या कर्जासाठीदेखील कार लोनसाठी लागणारी कागदपत्रे द्यावी लागत आहेत. याचा फायदा लहान बँकांसह इतर आर्थिक संस्था (एनबीएफसी)घेत आहेत. त्या १० ते २६ टक्क्यांपर्यंत व्याजदराने कर्ज देतात. राष्ट्रीयीकृत बँकांत हेच दर ८ ते १० टक्क्यांदरम्यान असतात. देशात या वर्षी १ कोटीपेक्षा अधिक टू व्हीलरची २० ते ६० टक्क्यांपर्यंत विक्री गावांमध्ये झाली आहे. फेडरेशन आॅफ आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचेे सीईअो सहर्ष दमानी यांच्या मते ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या बँकांच्या कर्ज देण्याच्या नियमावलीत बसत नाही. एनबीएफसी बँक स्टेटमेंट आिण सिबील स्काेअरएेवजी कॅश फ्लो पाहतात. यावरून ते अंदाज बांधतात की, संबंधित व्यक्ती कर्ज परत करू शकेल इतके पैसे संबंधितांच्या खात्यात वर्षभरात येतील की नाही. या कागदपत्रांची केली जाते मागणी एसबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या मते, प्राप्तीकर परतावा, सॅलरी स्लिप, व्यवसाय असेल तर जीएसटीएन क्रमांक, बँक स्टेटमेंट, केवायसी आदी कागदपत्रांची मागणी लोन देण्यासाठी केली जाते. इतका जास्त भार.. १ लाख कोटींचेे कर्ज, १२ हजार कोटी व्याज : देशात ६०% दुचाकी गाड्या लोनद्वारे खरेदी केल्या जातात. २०२३-२४ मध्ये १.७५ कोटी गाड्या १.६० लाख कोटीत विकल्या गेल्या. त्यात १ कोटी गाड्यांसाठी ९० हजार कोटी रु. लोन लागले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/x4VLOJG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.