जिल्ह्यातील बोरवाडी (ता.भोकर) याआदिवासीबहुल गावातील रहिवासी तथावैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव खंदारेयांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतरजिल्हा परिषद शाळेसाठी स्वतःची १० गुंठेजमीन दिली. त्यांची प्रेरणा घेऊन आजगावातील २० मुले डॉक्टर झाली आहेत.ऊसतोड मजुरांचे गाव असलेल्या बोरवाडीचीओळख आता ‘डॉक्टरांचे गाव'' म्हणून निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड-भोकर रस्त्यावरदोन हजार लोकवस्तीचे बोरवाडी गाव आहे.गावाच्या चारीही बाजूने जंगल आहे.झोपडीवजा शेणामातीची घरे गावकऱ्यांचीस्थिती सांगतात. दिवाळीपूर्वी शेती आणिमजुरी, तर दिवाळीनंतर आंध्र आणि तेलंगणातऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचे हे गावआहे. दुष्काळी परिसर असल्यानेशिक्षणाशिवाय पर्याय नाही. गावातील रहिवासीव आता मांडवीचे (ता. किनवट) वैद्यकीयअधीक्षक डॉ. शिवाजीराव खंदारे यांनाशिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला.गावात शाळा नसल्याने त्यांना किनवटमधीलआश्रमशाळेत राहून प्राथमिक व माध्यमिकशिक्षण घ्यावे लागले. पुढे छत्रपतीसंभाजीनगरला एमबीबीएसला प्रवेश घेत त्यांनीवैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आपल्या वाट्यालाआलेला संघर्ष इतरांच्या वाट्याला येऊ नयेम्हणून त्यांनी १९८६ मध्ये शाळेसाठी १० गुंठेजमीन दिली. त्यामुळे पाचवीपर्यंत गावातच विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची सोय झाली.डॉ. खंदारे यांची प्रेरणा घेऊन गावातून १६ एमबीबीएस, २ बीएएमएस, १ बीएचएमएस व १ पशुवैद्यकीय असे २० डॉक्टर या गावाने घडवले आहेत, अशी माहिती आदिवासी समाजाचे तालुका समन्वयक गंगाधर वानोळे यांनी दिली. पहिल्या डॉक्टरने शाळेला दिली जमीन गावाने घेतली झेप : गावातून अनेक गुणवंतविद्यार्थी घडल्याने या गावाने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेआहे. कालांतराने गावातील अनेक विद्यार्थी राज्यासहदेशातील नामांकित संस्थांमध्ये शिकत आहेत. अजूनहीकाही जण वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत.गावातून जे डॉक्टर झाले आहेत, ते देखील विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करण्यासाठी पुढे येत आहेत. अशाप्रकारे यागावाने आदर्श निर्माण केला आहे. संपर्कातील प्रत्येकाला मार्गदर्शन ^गावातून कोणी शिकलेला नव्हता. गावाची पस्थितीफारशी चांगली नव्हती. शिक्षणाशिवाय पर्याय नाही.शिक्षणाचे धेय उराशी बाळगून वाटचाल केली. याप्रयत्नातून वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो. त्यानंतर माझीप्रेरणा इतरांनी घेतली. संपर्कातील मुलांना वैद्यकीयशिक्षणासाठी नेहमीच मार्गदर्शन करतो. -डॉ. शिवाजीराव खंदारे, वैद्यकीय अधीक्षक
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/wQ2g0JB
ऊसतोड मजुरांच्या गावात घडले 20 डॉक्टर:आमूलाग्र बदल; दोन हजार वस्तीच्या बोरवाडीची ओळख आता ‘डॉक्टरांचे गाव''
January 19, 2025
0