राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाज सुधारकांचे नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळात बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने बुलडाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यास जगद्गुरू पलसिध्द महास्वामी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव बहाल करण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अवर सचिव भास्कर बनसोडे यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे जगद्गुरू पलसिध्द महास्वामींच्या मठाला ९६६ वर्ष होत असून तेथेच महाराजांची समाधी आहे. जगद्गुरू पलसिध्द महास्वामींनी ९८० इ. स. १०५८ मध्ये पळसाच्या झाडाखाली संजीवन समाधी घेतली. साखरखेर्डा येथील हा मठ उज्जयिनी पीठाचा शाखा मठ आहे.या मठाच्या देशात अडीचशेच्या वर उपशाखा असून पाच लाखाचे वर भक्त परिवार आहे. साखरखेर्डा येथे स्मृती महोत्सव, गुरूपोर्णिमा, श्रावणमास उत्सव अशी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ज्या मध्ये रक्तदान शिबीर, धर्म सभा, मोफत आरोग्य शिबीर, याबरोबरच लहान मुलांना मोफत पाठशाळा चालविली जाते. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे नाव देण्याची गागणी केली होती. सिंदखेडराजाला राजे लखुजीराजे जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा राजे लखुजीराव जाधव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा यास महर्षि पाणिणी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संग्रामपूर, कल्पना चावला अशी नावे देण्यात आलेली आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QBNVwmk
प्रशिक्षण संस्थेला पलसिद्ध महास्वामींचे नाव:शिवाचार्य महाराज यांचे प्रयत्न; सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बदलले नाव
January 16, 2025
0