अमरावती जिल्हा वकील संघाने प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ‘स्वर कस्तुरी’ संगीत मैफलीत गीतगायनाच्या मेजवानीने न्यायाधीश व वकिलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती जिल्हा वकील संघाने ‘स्वर कस्तुरी’ या बहारदार गीत गायन संगीत मैफलीचे आयोजन केले होते. जिल्हा न्यायालय इमारत परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संगीत स्वर हे मानवी मनाला शीतलता व आनंदी करणारे असतात. हा स्वरयात्री आनंद अमरावती जिल्हा वकील संघाने आयोजित केलेल्या या स्वर कस्तुरी कार्यक्रमातून उपस्थितांना मनसोक्त घेता आला. न्या. शिरीष देशपांडे आणि न्या. एस. जे. भट्टाचार्य यांनीसुद्धा गीत गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व गायक कलावंतांनी यात सहभागी होऊन बहारदार गीत सादर केले. याच बरोबर अमरावती जिल्हा वकील संघाचे सभासद ॲड. मिलिंद जोशी, ॲड. अतुल भेरडे, ॲड. ऋषी भुजाडे, ॲड. प्रियंका रोटे, ॲड. श्रेयश वैष्णव, ॲड. मधू राठी आदींनी एकापेक्षा एक सरस अशा सुंदर गीतांनी कार्यक्रमात रंगत भरली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी केले. कार्यक्रमाला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा‚ न्या. ए. एच. लद्दड‚ न्या. एच. मनवर‚ न्या. पी. ए. साबळे, न्या. पी. डी. झांबरे, मुख्य न्याय दंडाधिकारी भट्टाचार्य, कामगार न्यायालयाचे न्या. निसाळ तसेच कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. आर. पोंदकुळे आदी मान्यवरांसह अमरावती वकील संघाचे सर्व सभासद हजर होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/CFoLNIe
‘स्वर कस्तुरी’मधून न्यायाधीश, वकिलांच्या कलांची उधळण:प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यायालयात संगीत मैफल
January 28, 2025
0