Type Here to Get Search Results !

श्री विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा उद्या होणार:यंदा बंगळुरूहून आला देवाचा विवाह पोशाख, पंढरीतील विठ्ठल मंदिरात विवाह सोहळ्याची तयारी सुरू

पंढरपूरश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध पंचमी ( २ फेब्रुवारी ) वसंत पंचमीनिमित्त साजरा होत आहे. पंढरीतील विठ्ठल मंदिरात या सोहळ्याची परंपरेनुसार तयारीची धामधूम सुरू आहे. या विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूहून आलेला पोशाख प्राप्त झाला आहे. हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री रुक्मिणी स्वयंवर कथा ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान दुपारी ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी स.१० ते दुपारी १२ या वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होत आहे. पोशाख आषाढीत भाविकांना देण्याची व्यवस्था विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भाविकांकडून आलेला पोशाख आषाढी यात्रा काळात भाविकांना देणगी मूल्य घेऊन देण्याची व्यवस्था केली जाते. कपड्याचा पोत लक्षात घेऊन पाेशाख वस्त्रांचे देणगी मूल्य ठरते. काही साड्यांचा उपयोग मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांना भेट स्वरुपात देतात. विठ्ठलाला पांढरे पागोटे करतात परिधान वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे काकडा आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुखवट्याऐवजी पांढरे पागोटे घालण्यात येते. या दिवसापासून श्री विठ्ठलास पांढरा पोशाख रंगपंचमीपर्यंत सुरू होतो. पहाटे नित्यपूजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो. तसेच श्री रुक्मिणी मातेकडे काकडा आरती व नित्यपूजेच्या वेळेस वसंत पंचमीनिमित्त सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OlutxEC

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.