हिंदुत्वावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम विद्यार्थिनींसंदर्भात एक नवा वाद सुरू केला आहे. बुरखा घालून दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देऊ नका. बुरखा घालून परीक्षा देता येणार नाही अशी व्यवस्था करा, अशी मागणी राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राणे यांनी म्हटले की, दहावी- बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे होणे महत्त्वाचे आहे. कुणी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे की नाही, हे तपासणे शक्य होत नाही. म्हणून बुरखा घालून केंद्रात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात यावी. आवश्यकता भासल्यास तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा शिक्षक नेमावेत.’ लांगूल चालन नकोच राणे म्हणाले की, माध्यमिक, बोर्डाने बुरखा घालून परीक्षेस बसण्याची मान्यता दिल्याचे परिपत्रक आहे. असे लांगूलचालन चालणार नाही, अशी भूमिका मी शिक्षणमंत्र्यांकडे मांडलीय. बुरखा घालून परीक्षेला बसण्याचे इतरही धोके आहेत. ते लक्षात घेऊन हा परीक्षा देण्याचा निर्णय रद्द करावा. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये, असे राणे म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/65VKYtP
दहावी-बारावी परीक्षा केंद्रात बुरखा घालून प्रवेश देऊ नका:मंत्री नितेश राणे यांचे शिक्षणमंत्री भुसे यांना पत्र
January 29, 2025
0