Type Here to Get Search Results !

सहकार विकासातून अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डाॅलरची होईल:प्रत्येकाला क्षमतेनुसार काम सहकारी चळवळीतून शक्य- शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर दोन संकल्प ठेवले आहेत. यामध्ये २०४७ पर्यंत या देशाला पूर्ण विकसित राष्ट्र बनवायचे आहे. तसेच २०४७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करायची आहे. सहकार क्षेत्राच्या िवकासाशिवाय हे दोन्ही संकल्प पूर्ण होणार नाहीत, असे केंद्रीय गृह तसेच सहकारिता मंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. पुण्यातील जनता सहकारी बँक लिमिटेडच्या हीरक महोत्सवाचा समारोप त्यांच्या उपस्थित झाला त्यात त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह सहकारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. शाह म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि त्याला देशाच्या विकासासोबत जोडणे हे केवळ सहकारी चळवळीतून शक्य आहे. प्रत्येकाला देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. ज्यांच्याकडे विकास कामांसाठी निधी नाही तो त्यांना मिळवायचा असेल एकमात्र उपाय सहकार क्षेत्रच आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेत २० लाख जणांना घरकुल ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २० लाख जणांना घरकुल मंजुरीपत्राचे वाटप आणि १० लाख लाभार्थींना प्रथम हप्त्याचे वितरण शाह यांच्या हस्ते झाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3e7LFMR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.