जालना येथील बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचाखून करून मृतदेह लासूर स्टेशन येथील स्मशानभूमीजवळील दायगाव रस्त्याच्या कडेलाअसलेल्या इनामी जमिनीतील पडक्याघरात पुरण्यात आला. शुक्रवारी नायबतहसीलदार, वैद्यकीय अधिकारी,ग्रामविकास अधिकारी आणिपोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेरकाढण्यात आला. मोनिका झांबरे असेमृत विवाहितेचे नाव आहे. सदरघटनेत विवाहितेचा नवरा सासू सासरेयांच्या सांगण्यावरून लासूर स्टेशनयेथील इसमाने अपहरण बलात्कारकरून खून केल्याचा आरोप करण्यातआला आहे. याप्रकरणी शिल्लेगावपोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मोनिका सुमित निर्मळ (३०) रा. रमाईनगर रेल्वे स्टेशन जवळ जालना असे खून झालेल्यामहिलेचे नाव आहे. याप्रकरणी इरफान शेख यासपोलिसांनी अटक केली असून सुमित (पती) निर्मळसासू सपना निर्मळ, सासरा संजय निर्मळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका छत्रपती संभाजीनगर येथील सादातनगरमहापालिकेच्या दवाखान्यात स्टाफ नर्स म्हणून कार्यरतहोती. ६ फेब्रुवारीला ती बेपत्ता झाली. त्यामुळे तिचेकुटुंबिय घटनेच्या दिवसापासून चिंतेत होते. कुटुंबियांना आरोपी इफानबाबतकाही दिवसांपूर्वी बोलली होती.त्यामुळे पोलिसांनी इफानलाताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानेया घटनेची माहिती दिली . तसेचशुक्रवारी पोलिसांना घटनास्थळदाखवले. त्यानंतर मृतदेह बाहेरकाढण्यात आला. पडक्या घरातपाच फूट लांबीचा आणि साडेतीनफूट खोल खड्डा घेऊन मृतदेहपुरण्यात आला होता. जालनापोलिस ठाण्याचे फौजदार ज्ञानेश्वरनांगरे यांनी ही माहिती दिली. याप्रकरणातील आरोपी इरफान पाशाशेख याला गुरुवारी पोलिसांनीताब्यात घेतले. मोनिकाचा मृतदेहविवस्त्र अवस्थेत होता, त्याचेजागीच शवविच्छेदन झाले. खुनानंतर केली दिशाभूल कुणी तरी मयत माेनिकाच्या माेबाइलवरूनतिच्या कुटुंबीयांना एसएमएस टाकले कीमी दुसरे लग्न केले. मी वर्षभरानंतर परतयेणार अाहे. खूनानंतर तिच्या फाेनपेचाहीवापर झाल्याचे समाेर अाले अाहे.खूनानंतर दिशाभूल करण्यात आली. माेनिकाचे इरफानशी अनेक वेळा संभाषण माेनिका झांबरे या विवाहिता व अाराेपी इरफान शेख याचेमाेबाईलवर अनेक वेळा तासन््तास बाेलणे झाले असल्याचेपाेलिस तपासात उघड झाले अाहे. त्यामुळे माेनिका व इरफानयांचे काय संबंध हाेते. याचा पाेलिस शाेध घेत अाहे. इरफानशेख याने माेनिका हिचा खून केल्याचा पाेलिसांना संशयअाहे. ताे का केलाॽ याचा उलगडा अद्याप झालेला नाही. विवाहितेचा पती,आरोपी मित्र आरोपी इरफान शेखतासन्तास मोनिकाशीफोनवर बोलत होता. तोसंभाजीनगर रेल्वेस्थानकावरील पार्किंगमध्येकाम करायचा. मोनिकाचापती सुमित निर्मळ आणिइरफान मित्र असल्याचीमाहिती पोलिसांनी दिली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YFA3yIt
क्रूरतेचा कळस:नर्सचा खून करून मृतदेह लासूरजवळपडक्या घरात पुरला, संशयित अटकेत; मृत मोनिकाच्या मोबाइलवरून पाठवले कुटुंबीयांना मेसेज
February 14, 2025
0