Type Here to Get Search Results !

वाहनाच्या धडकेत पितापुत्राचा मृत्यू:रवाळाजवळील घटना; गव्हाणकुंडचे पितापूत्र दुचाकीने जात होते शेतात

मध्य प्रदेशातील मोरखा येथील शेतात जाण्यासाठी निघालेल्या गव्हाणकुंड येथील शेतकरी पितापुत्राचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी रवाळानजीक घडली. भगवानदास बिहारे (५५) व मिलिंद भगवान बिहारे (२५) असे अपघातातील मृत पितापुत्राचे नाव आहे. तालुक्यातील गव्हाणकुंड येथील रहिवासी भगवानदास बिहारे हे त्यांचा मुलगा मिलिंदसोबत दुचाकीने (एमएच ३१ डीए ८८१२) सकाळी साडेअकरा वाजता मध्य प्रदेशातील मोरखा, जि. छिंदवाडा येथील शेतात जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी रवाळानजीक समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप व्हॅनने (एमएच ०४ एफजे १८५१) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मिलिंद बिहारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी वडील {उर्वरित. पान ४

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dajFZcM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.