भंडारा जिल्ह्यात शेतात वाघाचा एक बछडा मृतावस्थेत सापडला तर त्याच्याजवळच आणखी एक अशक्त बछडा दिसून आला. मात्र त्यांची आई तिथे न आढळल्यामुळे शिकारीचा संशय व्यक्त केला जात आहे. नवीन वर्षात सुमारे दीड महिन्यातच िवदर्भात अातापर्यंत १२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला अाहे. ११ फेब्रुवारीला भंडारा वन विभागांतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसूर, नियत क्षेत्र खापा, मौजा मांडवी या ठिकाणी बावनथडी कॅनाॅलला लागून शेतामध्ये वाघाचा एक बछडा मृत अवस्थेमध्ये आढळून आला. माहिती मिळताच वनाधिकारी, कर्मचारी पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुसरा बछडा अशक्त असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता वन्यप्राणी उपचार केंद्र, गोरेवाडा येथे हलवण्यात आले तर मृत बछड्याचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. दोन्ही वाघ (मादी) बछड्यांचे वय २ ते ३ महिने आहे. कारणे
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/eT7dNJ1
भंडारा वाघाच्या बछड्याचा मृत्यू; दीड महिन्यात विदर्भात 12 वाघ दगावले:दुसरा बछडा जिवंत आढळला, वाघीण न दिसल्याने शिकारीचा संशय
February 12, 2025
0