Type Here to Get Search Results !

संभाजीनगरच्या रेडीरेकनर दरात 3.53% दरवाढ:घरे महागणार, राज्यात मनपा क्षेत्रात 5.95%, ग्रामीण क्षेत्रात 3.36% वाढ

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहराच्या रेडीरेकनरच्या दरात 3.53 टक्के एवढी दरवाढ शासनाने केली. तर राज्यभरात मनपा क्षेत्रात 5.95 टक्के तर ग्रामीण भागात 3.36 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. काेराेना संकटामुळे राज्य सरकारने मागील तीन वर्षात रेडीरेकनरच्या दरात वाढ केली नव्हती. त्यामुळे यावर्षी दरवाढ होणार हे निश्चित होते. त्यासाठी जिल्हा पातळीवरून शिफारशी देखील मागवण्यात आला होत्या. छत्रपती संभाजीनगरमधून प्रशासनाच्या वतीने पाच टक्के दरवाढीची शिफारस करण्यात आली होती. राज्य सरकारने ग्रामीण क्षेत्रात ३.३६ टक्के तर प्रभाव क्षेत्रात ३.२९ टक्के नगरपालिका क्षेत्रात ४.९७ टक्के आणि मनपा क्षेत्रात ५.९५ टक्के रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात मनपा क्षेत्रात ३.५३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता घराच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे. अशी झाली वाढ शहरसरासरी वाढ (%) लातूर४.०१ परभणी३.७१ नांदेड३.१८ जालना४.०१ नाशिक७.३१ सोलापूर१०.१७ जळगाव५.८१ अहिल्यानगर५.४१ अमरावती८.०३ अकोला७.३९ पुणे४.१६ पिंपरी चिंचवड६.६९ ठाणे७.७२ नवी मुंबई६.७५

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ODUfBqa

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.