दिवसेंदिवस सोन्याचे दर उच्चांक गाठत आहेत. गुढीपाडव्याच्या तोंडावर नऊ दिवसांपूर्वी १९ मार्चचा ८९,२०० (जीएसटी वगळून) दर होता. शुक्रवारी हा उच्चांक मोडीत काढून ८०० रुपयांची वाढ झाली.आता प्रतितोळ्याचे दर ८९,७०० (जीएसटीसह ९२,३९१) रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरातही १ हजार रुपयांची वाढ होऊन भाव प्रतिकिलो १ लाख २ हजार रुपयांवर गेला आहे. अमेरिकेचेे नवे व्यापार कर धाेरण, इतर देशांच्या बँकांकडून सोन्याची वाढतर खरेदी दरवाढीस कारणीभूत ठरली आहे. मार्चअखेरपर्यंत दाेन हजार रुपयांची वाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला हाेता. मात्र, प्रत्यक्षात अखेरच्या आठवड्यात १४०० रुपयांची वाढ नाेंदली गेली. साेमवारी ८८,३०० रुपये ताेळा असलेले साेने शुक्रवारी ८९,७०० वर पाेहचले. गुढीपाडव्यानंतर तेजी थंडावून दर स्थिर राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय साेने बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे दर घसरणीचाही अंदाज... आंतरराष्ट्रीय बाजारात ट्रम्प सरकार माेठ्या प्रमाणावर साेने विक्रीसाठी काढणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याबदल्यात ट्रम्प सरकार क्रिप्टाे चलन खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साेन्याच्या दरात घसरण होईल, अशी शक्यता आहे. परंतु दुसरीकडे जगभरातील देशांच्या बँकांकडून साेने खरेदी केली जात असल्याने त्याचा दरावर फारसा परिणाम हाेण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KJdB48G
गुढीपाडव्याच्या आधीच सोन्याचे दर 89700 रुपयांच्या नव्या उच्चांकावर:नऊ दिवसांपूर्वी 89,200 प्रति 10 ग्रॅम, चांदीही आता 1,02,000 रु. किलो
March 28, 2025
0