Type Here to Get Search Results !

परस्परविरोधी दोन खटल्याप्रकरणी दोन्ही राजे एकत्रित सातारा कोर्टात:एक प्रकरण निकाली, तर दुसरे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे झाले वर्ग

जुन्या दोन प्रकरणांवरून सातारा जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी माघारी घेतल्यामुळे खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीचे प्रकरण न्यायालयाने निकाली काढले, तर सुरुची राडा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. साताऱ्यातील सन २०१७ मधील “सुरू’’’’ बंगला राडा प्रकरण आणि खिंडवाडीतील नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यासह मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरू आहेत. या प्रकरणात शनिवारी दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. यामध्ये न्यायालयात खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लागला. यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Hn10Kc3

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.