Type Here to Get Search Results !

न्यूयॉर्कमध्ये डॉ. आंबेडकर दिन आज प्रथमच साजरा होणार:महापौर ॲडम्स यांची घोषणा, 12 एप्रिल रोजी घोषणापत्र जारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीपासून (२०१६) जगातील अनेक देशांत भीमजयंती साजरी केली जाते. अमेरिकेतील संस्था, संघटनांमार्फत आतापर्यंत जयंती होत असे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात १५५ देशांच्या प्रतिनिधींसह जयंती अशीच साजरी झाली. मात्र यंदा न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी १२ एप्रिलला प्रोक्लेमेशन (परिपत्रक) जारी केले. यात अमेरिकन सरकारतर्फे १३४ वी जयंती साजरी करण्याचे घोषित करून १४ एप्रिल २०२५ हा दिवस ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्यांनी घोषणापत्रात बाबासाहेबांचे कार्य अधोरेखित केले आहे. बाबासाहेबांची जयंती (१४ एप्रिल) साजरी करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचेही नमूद केले आहे. २००४ पासून पाठपुरावा; २०१६ मध्ये मोदींनी दिली एनओसी व्हाइट हाऊसमध्ये संरक्षण विभागातील उच्चाधिकारी दिलीप म्हस्के नोकरी करतात. ते तिथे ‘फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरिझॉन’ नावाची एनजीओ चालवतात. त्यांनी जयंतीसाठी अमेरिकेत २००४ पासून पाठपुरावा सुरू केला. मात्र भारतीय महापुरुषांच्या जयंतीसाठी भारत सरकारची ‘ना हरकत’ लागते. २०१६ दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हस्के यांनी भेट घेतली. तांत्रिक बाब मोदींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मोदींनी ‘ना हरकत’ दिली. तेव्हापासून जयंती साजरी होण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र कार्यालयासह दुबई जपान, रशियातही साजरी होणार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अमेरिकेत आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभागृहात १५५ देशांच्या प्रतिनिधींसह भीमजयंती साजरी केली जाईल. त्याशिवाय दुबई, जपान, कोरिया, इंग्लंड, फिलिपाइन्स, रशियातही जयंती सोहळा आयोजित केला आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/pUxd276

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.