Type Here to Get Search Results !

24 रुपये किलोच्या खैर चोरीतून 2400रुपयांचा काथ:गुटख्यासाठी 10 कोटींची खैर तस्करी; महाराष्ट्र - गुजरात सीमेवर मोठे रॅकेट

पार नदी. एका तीरावर महाराष्ट्रातील पेठ तालुक्यातील आंबा आणि झरी जंगल तर पलीकडे गुजरातची कपराडा आणि धरमपूर रेंज. दोन्ही राज्यांच्या वन विभागांसाठी ही सीमा खैर तस्करीची रेडलाइन बनली आहे. गुटख्याच्या वाढत्या मागणीमुळे काथाची मागणी वाढली आहे आणि काथासाठी खैराच्या लाकडाची. काथ तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट दर्जाचा लालजर्द खैर याच जंगलात शिल्लक आहे. येथून या लाकडाची पुष्पा स्टाइल १० कोटींची तस्करी पलीकडच्या गुजरातमध्ये सुरू आहे. याच सीमेवरील खिरडी गाव. खैर चाेरीच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला विष्णू राऊत आम्हाला येथे भेटला. धंद्यात जास्त पैसे मिळवायचे आणि शेठ बनायचे या मोहाने तो उंबर्णे गावच्या गँगमध्ये सामील झाला होता. सीमेपारचा नवसूभाई लोहार त्याचा शेठ. अल्लू अर्जुनचे फोटो शर्टवर लावणाऱ्या नवसूने अनेक आदिवासींना या धंद्यात ओढले आहे. नाशिक वनविभागाने गेल्या तीन वर्षांत हे नेटवर्क मोडून काढले. ५०हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले. स्थानिकांच्या मदतीने २४ रुपये किलोने खरेदी केल्या जाणाऱ्या खैराच्या लाकडापासून पुढे २४०० रुपये किलोचा काथ तयार केला जातो. स्वत:ला पुष्पा मानणारा गुजरातचा नवसू सध्या जामिनावर माेकाट गुजरातच्या कपराड्याचा नवसू लाेहार स्वत:ला पुष्पाच म्हणताे. नाशिक वन विभागाने गेल्या वर्षी त्याला अटक केली. तो जामिनावर मोकाट आहे. म्हाेरक्याच्या घरासमाेर खैरांची साल वलसाडमधल्या महेंद्र पटेलच्या घरापर्यंत नाशिकचे पथक पाेहाेचले पण ताे फरार झाला. घरासमोर खैरांची साल सापडली. इथून लोड होताे तस्करीचा माल येथून माल लोड होतो. नाशिक वन विभागाने नाइट पेट्राेलिंग, चेक पाेस्ट, चर खाेदून तस्करांचा बंदाेबस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांच्या मदतीने पार नदीच्या कपारीत दडवतात माल 1. आंबा, झरी जंगलामधील उंबर्णे, बाेरदे या गावांतून खैर चाेरले जाते. 2. चाेरलेला माल नदीपात्रातील कपारीत लपला जाताे. पाण्याने लाकूड जड हाेते. 3. महेंद्रभाईच्या गाड्या येण्याचा निराेप गावातील गँगपर्यंत पाेहाेचताे. 4. जंगलातील स्मशानाजवळ गाड्या लाेड होऊन गुजरातला रवाना हाेतात.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Z9p2dOj

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.