वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांना उत्कृष्ट सेवेसाठी सोमवारी (२८ एप्रिल) पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले. पण दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (२९ एप्रिल) एका महिला शिपायाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि फोटो पाठवल्यामुळे भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी हा संदेश ९ एप्रिल रोजी रात्री पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, हा गुन्हा द्वेषभावना आणि गैरसमजातून झाला, असे भंडारे यांचे म्हणणे आहे. पोलिस मुख्यालयात ३४ वर्षांच्या फिर्यादी शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ एप्रिल रोजी रात्री घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका नंबरवरून कॉल आला. परंतु, त्या आईसोबत बोलत असल्याने त्यांनी कॉल घेतला नाही. नंबर सेव्ह नसल्याने त्यांनी ‘कौन?’ असा मेसेज पाठवला. त्यावर अधिकाऱ्याने स्वतःचा फोटो पाठवला आणि लगेच डिलीट केला. त्यावर त्यांनी पुन्हा ‘कौन?’ अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवला. याप्रकरणी मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/SUiTJ98
गौरव झालेल्या पीआयवर दुसऱ्या दिवशी विनयभंगाचा गुन्हा दाखल:संभाजीनगरातील घटना, महिला शिपायाची तक्रार
April 29, 2025
0