अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विदर्भात १० बालविवाह रोखण्यात आले. नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बालविवाह जिल्हा बाल संरक्षण पथकाने रोखले. संबंधित मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात हलवण्यात आले. डोंगरगावमध्ये १५ वर्षांच्या मुलीचा बालविवाह होणार होता, तर कन्हान परिसरात एका १७ वर्षीय मुलीचा विवाह रोखला. दरम्यान, नागपूर २, अकोला १, यवतमाळ ४, बुलडाणा १, वाशिम १, वर्धा १, तर मराठवाड्यात चार बालविवाह रोखण्यात आले. काटोल तालुक्यातील डोंगरगाव तसेच कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह होणार असल्याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली. त्यानुसार तातडीने कारवाई करून बालविवाह थांबण्याची कारवाई करण्यात आली. १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार होता. मुलीला हळद लागून मुलगी मंडपात येण्याच्या तयारीमध्ये होती. मंडप सजलेला होता. पाहुण्यांचे आगमन होत होते व स्वयंपाक पूर्ण झालेला होता. त्यातच बाल संरक्षण पथकाचे अधिकारी कर्मचारी मंडपात धडकले. दुसऱ्या प्रकरणांमध्ये मुलगी १७ वर्षांची असताना तिथे पण मुलीला हळद लागलेली होती. दोन्ही ठिकाणी नातेवाइकांनी खूप गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांना तिथे पाचारण करण्यात आले. जालना जिल्ह्यातील मंठा, शंभू सावरगावात २ बालविवाह रोखले जालना | जालन्यात मंठा, शंभू सावरगाव येथील बालविवाह चाइल्डलाइनच्या सदस्यांनी रोखले. गुरुवारी मुलगा, मुलीच्या नातेवाइकांना बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार अाहे. दोन ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच महिला व बालकल्याण विभागाचे पथक व संबंधित ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन नातेवाइकांना समज दिली. दोन्ही ठिकाणी जाऊन हे बालविवाह रोखण्यात आले आहेत, तर टेंभुर्णी येथेसुध्दा बालविवाहाची माहिती मिळाली. १ बालविवाह रोखला हिंगोली | ग्राम बाल संरक्षण समितीने बुधवारी १ बालविवाह व साक्षगंधाचा कार्यक्रम रोखला. या वेळी मुलगा व मुलीच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील बालविवाह रोखला, तर वसमत तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीचा साक्षगंधाचा कार्यक्रम थांबवला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/mI2KJyr
नातेवाइकांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न, अक्षता पडण्याआधी कारवाई:अक्षय्य तृतीयेला विदर्भात दहा, तर मराठवाड्यात 4 बालविवाह रोखले
April 30, 2025
0