नाशिक येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) माध्यमातून शिवसेनाप्रमुखांच्या आवाजातील एक भाषण ऐकवण्यात आले. त्यात बाळासाहेब भाजप, एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे ऐकण्यास मिळाले. यावर शिंदेंनी गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आता त्यांनी केवळ हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली आहे. पण एआयच्या माध्यमातून आवाज काढून तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार बदलता येणार नाही. सातारा येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे काही जुने व्हिडिओ मोबाइलवर दाखवत बाळासाहेब ठाकरेंचे एकनाथ शिंदेंबाबतचे विचार काय होते, तेही ऐकवले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bO6MYBn
‘एआय’ने बाळासाहेबांचे विचार बदलता येणार नाहीत:हिंदुत्वासोबत उद्धव ठाकरेंनी आता लाजही सोडली- शिंदे
April 17, 2025
0