तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग रस्त्यावर घडली. खून झालेल्या तरुणाचा मृतदेह हांडेवाडी-होळकरवाडी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत सापडला. तरुणाच्या खुनामागचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. हनीफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत हनीफ याचा भाऊ सगीर (वय ३४) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीफ एका व्यावसायिकाकडे वाहनचालक म्हणून काम करत होता. होळकरवाडी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटवली. हनीफ याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खूनामागचे निश्चित कारण समजले नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खांडे तपास करत आहेत. रेंजहिल्स परिसरात घरफोडी रेंजहिल्स परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने खडकीे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील रेंजहिल्स भागातील रॉयल कॅसल सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/atJIOA5
अज्ञात कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून:पुण्यातील कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण रस्त्यावरील घटना
May 11, 2025
0