अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी आमच्या पक्षातील काही आमदार उत्सुक आहेत. मात्र, त्याविषयी अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेतील. सत्तेत जायचे की विरोधी पक्षात बसायचे हे त्याच ठरवतील, असे शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. मी निर्णय प्रक्रियेबाहेर आहे. त्यामुळे सुप्रियाच काय ते ठरवतील, असा दावाही त्यांनी केला. त्यावर शरद पवारांचे नातू, आमदार रोहित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, अजित पवारांसोबत जाण्याविषयी मला अद्याप शरद पवारांकडून कोणतीही सूचना नाही. मात्र, त्यांनी विचारले तर मी माझे मत सांगणार आहे. त्यांना सांगून झाल्यावर माझे मत तुम्हाला सांगेन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याची प्रक्रिया शरद पवारांनी सुरू केली आहे. त्याची जबाबदारी त्यांनी अजित पवार, सुप्रिया सुळेंवर सोपवली आहे. याविषयी त्यांचे नातू आ. रोहित यांनी अनभिज्ञ असल्याची मखलाशी केली. ते म्हणाले की, शरद पवारांनी आम्हाला कुठल्याही सूचना दिल्या नाहीत, तसेच कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. पक्षाकडून बैठक घेण्यात आली नाही. यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा ही केवळ चर्चाच आहे. मात्र, कामे होण्यासाठी सत्तेत गेले पाहिजे असे काही ठरावीक आमदारांचे म्हणणे असू शकते. ठरावीक काही आमदारांमध्ये चर्चाही झाली असावी. सुप्रियांकडे देशाची जबाबदारी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे किंवा इतर मंडळी निर्णय घेतील, असे शरद पवारांचे म्हणणे असल्याचे माध्यम प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिल्यावर आ. रोहित म्हणाले की, यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की पवार आता कुठेतरी सांगत आहेत की, पुढच्या पिढीला आम्ही काही जबाबदारी देणार आहोत. सुप्रिया सुळे यांच्याकडे देशाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2LHcXIB
मला विचारले तर मी माझे मत सांगणार- आ. रोहित पवार:अजित पवारांसोबत जाण्याविषयी शरद पवारांची अद्याप सूचना नाही
May 09, 2025
0